Tuesday, October 15, 2024
Homeभंडारामुरमाडी / तूप जिल्हा परिषद क्षेत्रावर अनेक दिग्गजांच्या नजरा

मुरमाडी / तूप जिल्हा परिषद क्षेत्रावर अनेक दिग्गजांच्या नजरा

आरक्षणाचा फटका
लाखनी –
तालुक्यातील ६ पैकी ४ जिल्हा परिषदेचे मतदार संघ महिलांकरिता आरक्षित झाल्यामुळे तालुक्यासह बाहेरील ही काही दिग्गजांनी मुरमाडी / तूप जिल्हा परिषद क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवून कार्यकर्त्याच्या भेटीगाठी व मतदारांशी संपर्क सुरू केला असल्याने स्थानिक इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


कोविड -१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर ढकलण्यात आल्या होत्या तब्बल १५ महिन्यांनी परिस्थिती पूर्व पदावर येऊन जिल्हा कोरोना मुक्त झाल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले तथा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रनिहाय आरक्षण निश्चिती करण्यात आली .अनेक दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसल्यामुळे लगतच्या मतदार संघाकडे नजरा वळविल्या असून पक्ष श्रेष्ठीकडे गॉड फादरचे माध्यमातून तिकीटाची मागणी करण्यात आली असल्याच्या चर्चा होत आहेत.
लाखनी तालुक्यात लाखोरी ,मुरमाडी / सावरी ,मुरमाडी / तूप ,केसलवाडा / वाघ ,पोहरा व पालांदुर असे जिल्हा परिषदेचे ६ निर्वाचन क्षेत्र आहेत .त्यापैकी लाखोरी व केसलवाडा / वाघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , पोहरा अनुसूचित जाती महिला तर पालांदुर सर्वसाधारण महीलेकरिता आरक्षित करण्यात आले त्यामुळे या जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या दिग्गजांचा भ्रम निराश झाला असल्यामुळे लगतचे क्षेत्रात लॉबिंग सुरू केल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे . मुरमाडी / तूप जिल्हा परिषद क्षेत्रात सभोवतालचे क्षेत्र महिलांसाठी राखीव झाले तथा साकोली तालुक्यातील सानगडी अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे याही क्षेत्रातील १ दिग्गजसुद्धा मुरमाडी / तूप जिल्हा परिषद क्षेत्रात निवडणुक लढण्यास इच्छुक असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे .महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळे निवडणुक लढवित असल्याने उमेदवारांची गर्दी राहणार असली तरी मुरमाडी / तूप जिल्हा परिषद क्षेत्राकडे अनेक दिग्गजांच्या नजरा असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular