नेहरूजिंनि देश उभा केला आजचे पंतप्रधान देश विकत आहेत – नाना पटोले
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन पटावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी व भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यकर्त्यांना संबोधन करताना नानाभाऊ पटोले म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेस देशाची आर्थिक परिस्थिती, दळणवळणाची साधने ,अशिक्षितपणा ,अंधश्रद्धा ,नापिकी, त्यामुळे देशासमोर खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यावेळेस देशाच्या बजेट फक्त 350 कोटी रुपये इतका होता जे आज एखाद्या गावातील नळपाणी योजनेचे असते.
ही प्रदर्शनी पक्षीय न राहता पक्षाच्या झेंडा न ठेवता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी केलेले कार्य व त्याग हा जनतेच्या लक्षात आणून दिला पाहिजे पंडित नेहरूंनी आपली संपूर्ण संपत्ती देशासाठी दान केली परंतु ज्यांनी देशासाठी काहीच केले नाही ज्यांनी इंग्रजांची दलाली केली असे राजकारणी लोक सोशल मीडियावर नेहरूजी यांच्याविरोधात अपप्रचार करून त्यांचे एडीट केलेले चुकीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत असतात व ज्यांनी देशासाठी काहीच केले नाही ते देश विकायला काढले आहेत अनेक सरकारी बँका ,रेल्वे, विमानतळे, सरकारी जमिनी, सुद्धा विकत आहेत पंडित नेहरूंनी देश उभा राहावा म्हणून समाजवाद व भांडवलशाही यांची सांगड घालत मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली व देशाला विकसनशील देशाच्या दर्जा प्राप्त करून दिला. ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती त्या देशात आज विमाने बनायला लागली हे पंडित जवाहरलाल नेहरू यांची देण आहे असे ते म्हणाले.
सध्या स्थिती मध्ये महाराष्ट्रामध्ये व भंडारा जिल्ह्यांमध्ये धान खरेदी केंद्र बाबत मोठ्या प्रमाणात चुकीच्या बातमी पसरविण्याच्या काम होत आहे धान खरेदीबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला साडेचार लाख मेट्रिक टन धान विकत घेण्याची परवानगी मागितली होती परंतु केंद्र शासनाने फक्त एक लाख मेट्रिक टनाचे मंजुरी दिली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे केंद्रातील बसलेली सरकार ही शेतकरीविरोधी आहे हे यातून स्पष्ट होते मी स्वतः पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान उचल व्हावे म्हणून प्रयत्नशील आहे.
उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी देश एकसंघ रहावा जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नये असे आव्हान सर्व काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना केले होते तेच आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा केल्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत केले पाहिजे. असे सांगितले. या प्रदर्शनी कार्यक्रम युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत भंडारा जिल्हा युवक काँग्रेस भंडारा जिल्हा काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी नानाभाऊ पटोले यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाप्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी प्रदेश महासचिव जिया भाई पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपजी बनसोड, जिल्हा परिषद चे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे,जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके सभापती स्वाती वाघाये युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राकेश कारेमोरे युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक धवड, देवेंद्र हजारे,सदाशिव वरठे, धनराज साठवणे प्यारेलाल वाघमारे , सुभाष भाऊ आजबले, विनीत देशपांडे, प्रशांत देशकर ,गायत्री वाघमारे, अनिता भुरे, अजय मोहनकर शंकर तेलमासरे, गणेश लिमजे, प्रमोद तितीरमारे, बालू भाऊ ठवकर, रामलाल चौधरी धनंजय तिरपुडे ,सोहेल अहमद, अनीक जमा पटेल, जय डोंगरे, योगेश गायधने , विजय देशकर ,मनोज बागडे ,महेंद्र वाहने ,जीवन भजनकर ,आकाश ठवकर, सचिन फाले , मुकुंद साखरकर, शिवा गायधने ,अमित खोब्रगडे ,पवन मस्के, आनंद चिंचखेडे, इम्रान पटेल ,आकाश बोंद्रे, श्रीकांत बनसोड ,प्रफुल शेंडे, मोहन चीलमकर, मोहन निर्माण, राजू निर्वाण, कमल साठवणे, सुचिता गजभिये, प्रिया खंडारे सुनंदा धनजोडे संध्या धांडे पुष्पा साठवणे मंगेश हुमने शाईन मून, चांद मेश्राम निखिल तिजारे, आवेश पटेल व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.