भंडारा :-
लुक्यातील मांडवी (बेलगाव) येथील जय हनुमान देवस्थान पंच कमेटी व समस्त मांडवी ग्रामवासी यांच्या संयुक्त सहकार्याने भव्य श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन विविध सेवा सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सहषराम बुजाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सोमकांत मडामे होते. प्रमुख पाहूणे म्हणून मांडवी येथील सरपंच सहषराम कांबळे, माजी पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण बेदरकर, उपसरपंच प्रभाकर सार्वे, मनोज वडतकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष हिवराज मेश्राम, हगरू सार्वे, प्रवचनकार हभप चक्रधर रेहपाडे, विजय रोटके, सेवानिवृत्त रामभाऊ रेहपाडे, सेवा निवृत्त सैनिक लक्ष्मण वाट, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मडामे, ग्रा.प. सदस्य सतीश बेदरकर, शालु बुजाडे, लता मदनकर, प्रौर्णिमा बडोले, माजी सरपंच सत्यशिला टेंभूर्णे, ग्रा.प. निर्मला लांबट, सुरेखा अहिर, शोभा मारबते, विलास केजरकर, हनुमान देवस्थान पंच कमेटीचे गणेश बुजाडे हरिदास पडोळे, विनायक कुथे, विक्की बेदरकर
उपस्थित होते. त्याप्रसंगी जय हनुमान व राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण व पोथीची पुजा करून श्रीमद भागवत सप्ताह सोहळा सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमात मयुरी बुजाडे, अर्पिता बेदरकर व वैष्णवी बुजाडे यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. मंगळवार, दि. २५ जानेवारी २०२२ दुपारी २ वाजता दहिहंडी सोहळा ह.भ.प. चक्रधर रेहपाडे यांच्या हस्ते पार पडेल व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. कार्यक्रमाचे संचालन भास्कर बेदरकर व प्रास्ताविक गणेश बुजाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिता बुजाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सदस्य विजय बेदरकर, कैलास बुजाडे, भुमेश्वर केवट, प्रभाबाई कुथे व हनुमान देवस्थान पंच कमेटीचे पदाधिकारी तसेच ग्रामवासी यांनी सहकार्य केले.