समुद्रपुर :
मांडगाव शेतशिवारातील शेतात अज्ञात इसमाने मोहरी बियाणे फेकल्याचा अफलातून प्रकार 30 आक्टोबर रोजी उघडीस आला. सोयाबीन काढणी नंतर रब्बी हंगामी पेरणीसाठी तयार केलेली शेतजमीन निकामी व्हावी या उद्देशाने खोड्यारकी केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मांडगाव येथील मनोज वाघमारे या शेतकऱ्याने खरीपात सोयाबीन पिकाची काढणी करून रब्बी हंगामी पेरणीसाठी शेत तयार केले. दरम्यान 29 आक्टोबर रोजी शेतात गेले असता तब्बल सहा एकरात मोहरीचे बियाणे दानादान फेकून दिसलें.हा प्रकार बघून शेतकरी हैराण झाला. हा प्रकार सुद्बुद्धीने केला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यावेळी गावातील जाणकार शेतकऱ्यांनी पाहणी केली असता रब्बी हंगामी पेरणी करतांना शेतभर मोहरी उगावी आणि पेरलेला चण्याचे उत्पदान होऊ नये. शिवाय निंदन खर्च वाढावा यासाठी खोड्यारकी केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या अगोदर गंजी पेटवणे, पिकावर तननाशक फवारने इ प्रकार घडत होते ,पण हा नवीनच प्रकार समोर आल्याने ,शेतकरी पार हादरून गेले असून ,शेतकऱ्याचे 6एकर शेतीचे नुकसान झाले आहे,आता पाणी ओलवल्याशिवाय दुसरे पीक घेणे अशक्य नसून संपुर्ण मोहरी अंकुरित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
शेतीच्या मकत्याचे शेती करतात.
यावर्षी एकरी माकत्याची किमत 20 ते 30 हजार रुपये आहे , या स्पर्धेतून च सदर प्रकार घडला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे ,