लाखनी :
महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी आरक्षण गेले. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात गेले नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्रात गेले आहे. ओबीसीं समाजामध्ये जाऊन या सरकारचे सत्य मांडायला हवं, कशा प्रकारे आरक्षण गेलं, कशा प्रकारे अन्याय केला जातोय या सर्व गोष्टी समाजात सांगाव्या लागतील. या राज्य सरकारचा बुरखा उचलल्या गेला पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियानाची सुरवात केली आहे. पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रात जागर अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजी. मंगेश मेश्राम यांनी वरील वक्तव्य केले.
भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रात ओबीसी जागर रथ गुरढा, गोंडेगाव, कनेरी, पेंढरी, पोहरा या गावात जाऊन जनतेसमोर ओबीसी आरक्षणाबाबद वस्तुस्थिती मांडण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी, मराठा आणि अनुसूचित जाती जमातीचा विश्वासघात केला असून यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप ओबीसी मोर्चानी घेतली आहे. पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रातील अभियानात माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुदामजी शहारे, भाजप अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत पोहरा रामलाल पाटणकर, जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख पोहरा घनश्याम मते,ग्रामपंचायत सरपंच कनेरी जयंत बिनझाडे, भाजपा ओबीसी आघाडी लाखनी तालुका युवक संपर्क प्रमुख मुकेश मते, ग्रामपंचायत सदस्य पोहरा यशवंत खेडीकर, बुथ प्रमुख कनेरी तुलसीदास बांते,सोशल मीडिया प्रमुख भाजयुमो तेजस कमाने, बुथ प्रमुख रामदास धर्मशहारे, विजय गायधने, सौ. कुंभारे ताई आणि कार्यकर्ते उपस्थित होते