साकोली : महाराष्ट्र युवा परिषद भंडारा आणि उमेद बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने सुकडी येथे बचत गटाच्या महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोद पटले, संगीता संजय चीडलोटे, प्रमोद येलजलवार यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.
अगरबत्ती, फुलवात, पेन्सिल बनविणे याबाबत मार्गदर्शन केले. यातून बचत गटाच्या महिला आत्मनिर्धार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच
भुयार गावातील महिलांनाही मार्गदर्शन करण्यात आले.