भंडारा : महात्मा फुले मित्र मंडळ भंडाराच्या वतीने आयोजित वधू वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी नेपाल चिचमलकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) बारस्कर, तुळशीराम देशकर, निशिकांत भेदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचलन संजय बनकर आणि वृंदा गायधने यांनी केले. प्रास्ताविक डॉ. जयश्री सतोकर यांनी केले. याप्रसंगी परिचय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.