मोहाडी : पिंपळगाव येथे मंडईनिमित्त मराठी लावणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र इलमे, काँग्रेस पार्टीचे बूथ प्रमुख गजानन झंझाड, मोहाडी तालुका काँग्रेस महासाचिव श्रीकांत येरपुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका अध्यक्ष श्याम कांबळे, मोहाडी तालुका एनएसयूआय अध्यक्ष महेश ढेंगे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रोशन बुधे, एनएसयूआयचे अमित खोब्रागडे, उमेश उपरकर, राजेश गभणे तसेच समस्त ग्रामवासी उपस्थित होते.
