भंडारा : आगामी निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेशपूर जिल्हा परिषद सर्कलच्या बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी नितीन कडव, हेमंत बंडेबुचे, गणेशपूर सर्कल प्रमुख विनोद भुरे, युवा मोर्चा अध्यक्ष चितेश मेहर, पंचायत समिती माजी उपसभापती वर्षा गोवर्धन साकुरे, बबलु आतीलकर, गोवर्धन साकुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणूक बाबत खासदार मेंढे यांनी उपस्थित कार्यकत्यांना मागदर्शन केले.