Sunday, September 24, 2023
Homeभंडाराभंडाऱ्यात अनेक भागात नळाला अपुरा व दूषित पाणी पुरवठा

भंडाऱ्यात अनेक भागात नळाला अपुरा व दूषित पाणी पुरवठा

*नगर परिषदेचे कोणतेही नियंत्रण नाही
भंडारा :


शहरात अनेक वर्षांपा सून अशुद्ध पाणी पुरवठ्याची समस्या अजूनही निकाली निघू शकलेली नाही. यात भर म्हणून महिन्याभरापासून अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंडतों द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात अनेकांनी नळाला टिल्लूपंप लावल्याने व यावर नगर परिषदेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेक भागात नळाला अपुरा पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गेल्या एक महिन्यापासून शहरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंबबों तर दुसरीकडे ज्यांना पाणी मिळते ते अतिशय गढूळ व दुर्गंधीयुक्त असल्याची ओरड आहे. भंडारा शहराती ल नागरिक पिण्याच्या पाण्याची समस्या घेऊन नगर परिषदेच्या पाणी पुरवठा कार्यालयावर जातात. परंतु तेथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने समस्या कुणापुढे मांडावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. खांबतलाव येथील पाणीटाकी मधील कार्यालयात केवळ रोजंदारीचे मजूर हजर असतात. त्यामुळे अनेकदा त्यांनाच लोकांचे रोषाला बळी पडावे लागते. पाणी समस्येबाबत लोकप्रतिनिधीकडेही नागरिकांकडून अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा निगरगट्ट अधिकाऱ्यांबाबत मूग गिळून बसले आहेत. तर सध्या नगर परिषदेच्या सदस्यांचा ही कार्यकाळ संपला असल्याने अधिकारी ऐकत नसल्याचे सांगण्यात येते. जनतेची कामे करण्यासाठी अधिकारी ऐकत नाही, मात्र स्वतःच्या कामांचे बील काढून घेण्याचे बरोबर ऐकले जाते. ह्यावरून लोकप्रतिनिधी हे जनतेचे की अधिकाèयांचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडा तों वर असताना दूषित पाण्याची समस्या निकाली न काढल्यास पावसाळ्यात ही समस्या अधिकच वाढून शहरात रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या नगर परिषदेचा संपूर्ण कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी सांभाळत आहेत. मात्र त्यांचे पाणी समस्या सोडविण्यासा ठी कोणतेही नियोजन दिसून येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारभाराचा मनःस्ताप जनतेला होत आहे. पाणी समस्या निकाली काढण्याबाबत नुकतेच राष्ट्रवादीकडून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घेराव आंदोलनही करण्यात आले. यानंतरही कोणतीच दखल घेतली नसल्याने आजही दूषित पाणी पुरवठा होत आहे. ह्यावरून नगर परिषद प्रशासन हे लोकां चे जीवाशी खेळत असल्याचे निदर्शनास येत आहे. सततच्या नागरिकांचे तक्रारी व कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर नसणे तसेच लोकप्रतिनिधींचेधीं चेह्या अधिकाèयांवर कोणताही वचक नसणे ही मोठी शोकांतिका आहे. ही स्थिती शहरातील नागरिकांसाठी चिंताजनक असून आगामी पावसाच्या काळात शहरात रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास अश्या परिस्थितीत जनतेच्या आरोग्याचा वाली लोकप्रतिनिधी की अधिकारी ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular

22/09/2023

21/09/2023

20/09/2023