भंडारा :
प्रदेश अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार तसेच विदर्भ निरिक्षक वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्षनात भाजपा चे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांच्या जाहिर निषेध करण्यात आला. प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका केलीली आहे प्रवीण दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

हा फक्त राष्ट‘वादी काॅंग्रेस पक्षातील पुरूष, पदाधिकारी कार्यकर्ते यांचाच अपमान नसून संपूर्ण महिलांचा सुद्धा अपमान आहे. स्त्री मातेसमान संस्कृती असण्या-या महाराष्ट्रामध्ये महिलांना मान/सन्मान सषक्तीकरणाचे धडे देणारा एकमेव राष्ट्रवादी काग्रेस पक्ष आहे प्रवीण दरेकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहिर निषेध करण्यात आला, अश्या मानसिकतेला चोप बसण्यासाठी मा. श्री. उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुबई यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत निवेदन देण्यात आले. प्रविण दरेकर यांचेवर कार्यवाही व्हावी आणि पुन्हा कोणी अशी हिम्मत करू नये. अन्यथा जनतेच्या हिताकरीता भंडारा शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे संपूर्ण जिल्हयात तिव्र आंदोलन करण्यात येईल अश्या प्रकारचा ईशारा सुद्धा देण्यात आला. त्यावेळी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यामहिला जिल्हाध्यक्षा सौ. सरिताताई मदनकर, भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षा मंजुषा बुरडे, मिना नागपुरे, सौ. कल्पना नवखरे, सौ. किर्ती गणवीर, सौ. सविता सेवकदास गोखले, सौ. वनिता संजय भुरे, शुभांगी खोब्रागडे नगर परिषद सदस्य, लता मेश्राम, प्रिती रामटेके, वृंदा गायधने, सौ. संध्या सुनील बोदेले व फार मोठया संख्येने महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या