• पोहरा येथे फुटकळ व्यवसायिकांना ३५ छत्र्यांची वाटप
लाखनी :

उन, थंडी, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता ग्रामीण परिसरातील फुटकळ व्यवसायिक(चिल्लर विक्रेते) गावातील चौरस्ते, सार्वजानिक चौक, प्रार्थना स्थळे इत्यादी ठिकाणी वस्तू विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. उन व पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे. याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, लोकनेते आ. नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस कमिटी शाखा पोहरा चे वतीने ज्येष्ठ नेते ॲड. शफी लध्दानी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू निर्वाण, माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे यांचे नेतृत्वात हेमंत बडवाईक, ग्रामपंचायत सदस्य यशवंत खेडीकर, अमर बोडणकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विष्णू गिऱ्हेपुंजे, तमुस अध्यक्ष नारायण निर्वाण, सामाजिक कार्यकर्ता लोकचंद कुंभरे, ईश्वर दोनोडे, रामूदा अंबाडे, सुरेंद्र मोटघरे, जनार्धन गभने, प्रल्हाद गायधने, प्रतीक दिघोरे, अजय मते, राजू बोरकुटे यांचे मार्फत पोहरा येथील ३० ते ३५ फुटकळ व्यवसायिकांना “नाना ची सावली” ह्या उपक्रमाअंतर्गत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. फुटकळ व्यवसायिकांनी आ. नाना पटोले यांचे आभार मानले असून सतायुशी आयुष्याची कामांना केली आहे.