खाजगी वाहनचालकांची मनमानी
भंडारा :
तीन महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाचा लढा सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे संपानंतरही आता काही बसफेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्या मोजक्याच मार्गावर असल्याने याचा फायदा खाजगी बसचालकांकडून घेतला जात असून प्रवाशांची मोठी लूट होत आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि आर्थिक लूट कधी थांबणार? असा प्रश्न आता प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे.

भंडारा शहरातून राष्ट्री य महामार्ग असल्याने येथून नागपूर, रायपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर तीन महिन्या पासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीकरिता संप सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपासून सातत्याने प्रवासांची होरपळ होत आहे. खा जगी ट्रॅव्हल्स व इतर प्रवासी वाहन चालकांचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिकचे पैसे आकारून व क्षमतेपेक्षा अधिक संख्येने प्रवासी वाहनात कोंबूकों बून खाजगी वाहने पळविली जात आहेत. त्यातही प्रवाशांना सन्मानाची वागणूक तर दूरच पण अनेकदा अरेरावीची भाषाही या खाजगी वाहनचालकांकडून बोलली जाते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रासही सहन करावा लागतो. नागपूर-भंडारा-रायपूर या महामार्गावर नियमित चालणारे काही खासगी ट्रॅव्हल्स तर अत्यंत उर्मटपणे वागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. आरटीओ विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देऊन खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची होणारी थांबविणार का? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. एसटी बसेस बंद झाल्याने या संधीचा फायदा घेत खाजगी वाहन चालकांनी प्रवाशांची लुटमार सुरू केली. आर्थिक लूट तसेच प्रवाशांना मानसिक त्रास देण्याचे काम देखील खाजगी वाहन चालकांकडून वारंवार होत आहे. परंतु याबद्दल कुणीही काही बोलायला तयार नाही. मी स्वतः नागपूर येथून खाजगी ट्रॅव्हल्सने भंडारा येथे प्रवास केला असता चालक व वाहकांची प्रवाशांची वाहतूक ही अत्यंत खालच्या दर्जाची होती. सामान्य प्रवाशांची होणारी लूट तात्काळ थांबविण्यात यावी. अन्यथा नागरिकां ना सोबत घेऊन जनआंदोलन उभारू असा इशारा आदर्श युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष पवन मस्के यांनी दिला.