Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home भंडारा प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना नवसंजीवनी२१७० लाभार्थ्यांचे अर्ज : ९२ लाखांचे कर्ज वाटप

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना नवसंजीवनी
२१७० लाभार्थ्यांचे अर्ज : ९२ लाखांचे कर्ज वाटप

विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. ही योजना पथविक्रेत्यासाठी ‘नवसंजीवनी’ ठरीत असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये दिसून येत आहे. यात अनेकांच्या संसाराला हातभार लागला आहे.


कोव्हीड-१९ रोगाच्या संकटात संरक्षणाचा एक भाग म्हणुन संपूर्ण देशात संचारबंदी केली. त्याचा मोठा विपरीत परिणाम देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच मात्र सर्वसामान्य नागरीकांवर सुध्दा दिसुन आला. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले. तर काहींना नाईलाजास्त जिवासाठी स्वतःचे काम सोडावे लागले. शहरामध्ये हातावर पोट असलेल्या पथविक्रेत्यांना तर लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला. पथविक्रेत्यांना लॉकडाऊनमध्ये घरातच राहावे लागले. अशा अनेक घटकांचा पोटापाण्याचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. मात्र केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. पथविक्रेता सहाय्य अभियाना अंतर्गत आर्थिक सक्षमीकरण, पथविक्रेत्यांचे सबलीकरण करण्यासाठी ही योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार १७० पथविक्रेत्यांनी या योजनेकरिता अर्ज सादर केले आहे. प्रत्येकी १० हजार रुपये अशा जवळपास एक हजारापेक्षा अधिक लाभार्थांना ९१ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज मंजुर करुन सदर रक्कम लाभार्थांच्या बँक खात्यामध्ये वळती करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत भंडारा शहरातील ७२५ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे. ४०० च्यावर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत ३४ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले विशेष. कोरोना आणि लॉकडाऊनचा विविध घटकांवर परिणाम झाला. अर्थव्यवस्था डळमळीत झाली. त्यातुन मार्ग काढत एकेक घटकाला उभारी देण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारने पथविक्रेता सहाय्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी योजना नगरपालीका, नगर पंचायतीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार ५२० पथविक्रेत्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पथविक्रेत्याला तीन टक्के व्याजदरावर १० हजार रूपयाचे कर्ज एका वर्षाच्या मुदतीसाठी बँकेतुन दिले जाते आणि तेही सात टक्के अनुदानासह. विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना यानंतर वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे. कालावधीत कर्जाची परतफेड केल्यास वाढीव कर्ज प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एका वर्षाकरीता दिले जाणारे १० हजाराचे कर्ज दिलेल्या कालावधीत फेडल्यास त्या लाभार्थांना नव्याने वाढीव कर्ज दिले जाणार आहे. पथविक्रेत्यांना अशा प्रकारे कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे पथविक्रेत्यांना अच्छे दिन आले असेच म्हणावे लागेल.
डिजीटल व्यवहारावर एक हजार २०० रुपये परतावा १० हजारांचे कर्ज मिळाल्यानंतर पथविक्रेत्याने पूर्ण वर्षभर ऑनलाईन व्यवहार करणे आवश्यक आहे. जो पथविक्रेता ऑनलाईन व्यवहार करेल त्याला एक हजार २०९ रूपये परतावा मिळणार आहे. म्हणजे अनुदानाचे ७०० रूपये व एक हजार २०० रूपये परतावा असा एकुण एक हजर ९०० रूपयाचा फायदा हा पथविक्रेत्यांना होणार आहे. विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना यानंतर वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. त्याचा सर्वाधीक फटका हा शहरातील पथविक्रेत्यांना बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय पुर्णपणे बंद असल्याने जवळ असलेले पैसे कौटूंबिक खर्च झाल्याने आता व्यवसाय कसा करावा असा यक्ष प्रश्न पथविक्रेत्यांपूढे उभा ठाकला होता. केंद्र सरकारने पथविक्रेत्यांना दहा हजार रूपयांचे अर्थसहाय्य देवुन खरोखर त्यांच्या व्यवसायास पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया
जिल्ह्यातील पथविकेत्यांची संख्या बऱ्यापैकी असुन कोरोना संकटात व्यवसाय पुर्णपणे बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर नव्याने व्यवसाय सुरू करण्यास पथविक्रेत्यांना आर्थिक अडचण भासत होती. मात्र, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आजघडीला दोन हजार १७० पथविक्रेत्यांनी योजनेअंतर्गत कर्जाकरीता आवेदन केले असुन त्यापैकी एक हजाराच्यावर  पथविक्रेत्यांना जवळपास ९१ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थांना लवकरच कर्जाचे वाटप होणार आहे.

  • विनोद जाधव,
    मुख्याधिकारी न.प.भंडारा
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

साकोलीत पुन्हा घरफोडी, दोन लाखांचे रोख व ऐवज लंपास

भंडारा : बंद घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना...

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

• लाखनी येथील घटना• साश्रू नयनांनी अंत्यसंस्कारलाखनी : इयत्ता बारावीच्या...

भंडाऱ्यात अनेक भागात नळाला अपुरा व दूषित पाणी पुरवठा

*नगर परिषदेचे कोणतेही नियंत्रण नाहीभंडारा : शहरात अनेक वर्षांपा सून...

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021