तुमसर : पिपरा, येरली, झारली, आणि आगरी येथील बस फेरी सुरु करण्यासाठी विकास फॉउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. फेरी सुरु करण्यासाठी पाठपुरावा करून बसफेरी सुरु करण्यात येईल असे राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.

ही बसफेरी मानव विकास योजनेअंतर्गत सुरु होती आणि ही बस फेरी आंबेडकर नगर इंदूताई मेमोरियल शाळेजवळून पिपरा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना ने – आन करत होती. बंडू बनकर यांच्या मध्यस्थिने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला, असे बंडू बनकर यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा महाविद्यालये उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे पाहून बंडू बनकर यांनी पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवले.