Saturday, July 27, 2024
Homeभंडारापरिवर्तन हे पत्रकारीतेचे दायित्व : जिल्हाधिकारी, संदिप कदम

परिवर्तन हे पत्रकारीतेचे दायित्व : जिल्हाधिकारी, संदिप कदम

**पत्रकार भवनात ५५ वा राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात
**आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकारांनी केली तपासणी
भंडारा :
पत्रकारीतेच्या क्षेत्रात २० ते २५ वर्षात एक मोठी क्रांती झाली असून आजची पत्रकारीता ही दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. कमतरता दाखवणं हे जरी पत्रकारीतेचं मुळ हेतू असला तरी परिवर्तन हे सुध्दा पत्रकारीतेचे दायित्व आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी केले. ते स्थानिक मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित ५५ व्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमादरम्यान अध्यक्षीय भाषणादरम्यान बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा.वामनराव तुरीले, जेष्ठ पत्रकार एच.एस.पारधी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम, उपाध्यक्ष राकेश चेटूले, सचिव मिलींद हळवे आदी मान्यवर उपस्थित होते.


कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाNया पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरूवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना चेतन भैरम यांनी पत्रकारांनी जनजागृतीचे काम करतांना सकारात्मक लिखाण करावं असे मत व्यक्त केले. तर उपस्थित मान्यवरांमध्ये काँ.हिवराज उके, ज्ञानेश्वर मुंदे यांनीही उपस्थित पत्रकार बंधुंना मार्गदर्शन केले. जेष्ठ पत्रकार प्रा.वामनराव तुरीले, प्रा.एच.एस.पारधी यांनी तटस्थपणे लिखाण करावे व लोकप्रियता निर्माण करावी असे मत व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व गणमान्य वृत्तपत्राचे प्रतिनिधी इलेक्ट्रानिक मिडीयाचेही प्रतिनिधी प्रामुख्याने हजर होते. त्यामध्ये डि.एफ.कोचे, इंद्रपाल कटकवार, प्रमोद नागदेवे, सागर भांडारकर, चंद्रकांत श्रीकोंडावार, शशी वर्मा, काशिनाथ ढोमणे, अभिजीत घोरमारे, राजु आगलावे, विलास सुदामे, विजय क्षीरसागर, प्रमोद गभणे, दिपक रोहणकर, विलास केजरकर, ललीतसिंह बांच्छिल, सुरेश फुलसुंगे, जयकृष्ण बावनकुळे, सचिन मेश्राम, देवेंद्र रहांगडाले, प्रशांत देसाई, सुरेश कोटगले, राजेश मदान, पंकज वानखेडे, शुभम देशमुख, सय्यद जाफरी, मो.आबिद सिद्दीकी, संतोश जाधवर, संजिव जयस्वाल, यशवंत थोटे, मनोहर मेश्राम, सरवर शेख, समिर नवाज,ए.एस.कान्हेकर, शारदा पडोळे, चेतन शेंडे, विरेंद्र गजभिये, रविशंकर कटकवार, नेपालचंद खंडाईत, सागर ठाकरे,संजय भोयर, पृथ्वीराज बन्सोड, ज्ञानेश्वर मुंदे आदि उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयातील ई.सि.जी.तंत्रज्ञ सी.पी.कोहाड, अधिपरिचारीका अर्चना हटवार, शिल्पा लांजेवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलींद हळवे यांनी मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular