भंडारा :
8 डिसेंबर 2021 रोजी एक ईसम हा सौदी अरेबिया या देशातून आपल्या निवासस्थानी भंडारा येथे आलेला असून त्याने स्वत:चे विषयी कोणतीही माहीती प्रशासनाला कळविली नाही. त्यावरून नगर परिषद भंडारा येथील स्टाफने नमुद व्यक्तीचे घरी जाऊन शहानिशा केली असता सदर व्यक्ती हा कोविड-19 पॉझिटिव्ह असून सुध्दा व भारत सरकारने विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक केले असतांना सुध्दा सदर व्यक्तीने विलगीकरणाचे नियमाचे पालन केलेले नाही. सदर ईसमाने ईतरांचे जिवितास धोका आहे हे माहीत असून सुध्दा विलगीकरणाचे नियम न पाळता कोविड-19 आजाराचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य केले असल्याने नमुद ईसमाचे विरूध्द पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत अपराध क्र. 443/2021 कलम-188,270 भा.द.वी, सहकलम-3 साथीचे रोग अधिनियम 1897, सहकलम-51 (b) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली.
तरी भंडारा शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, विदेशातून प्रवास करुन आलेले प्रवासी ज्यांनी भारत सरकारचे निर्देशाप्रमाणे 14 दिवस विलगीकरणाचा कालावधी पुर्ण केला नाही. अशा प्रवाशाबाबत आपणास माहीती प्राप्त झाल्यास ताकाळ पोलीस स्टेशन भंडारा, तसेच नगर परीषद भंडारा येथे संपर्क करुन अशा विदेशातून येणाऱ्या प्रवाशाबाबत माहिती द्यावी. जेणेकरुन कोविड-19 आजारावर प्रतिबंध करणे शक्य होईल.