भंडारा :
राज्यात भाजप आणि शिवसेनेतील दरी दिवसें दिसेंस वाढत असतानाच आज एका जाहिर कार्यक्रमात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सेना चक्क सेना भाजपाचे जुने दिवस आणा असे मागणे मागितले. आ. भोंडेकरांच्या या जाहिररित्या केलेल्या मागणीमुळे सगळ्यांच्या नजरा टवकारल्या गेल्या.
भंडारा बायपास महामार्गाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला . यावेळी व्यासपिठावर अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी जिल्ह्याचे शिवसनेचे सर्वेसर्वा ज्यांच्याकडे पाहिले जाते आ. नरेंद्र भोंडेभों डेकर हे सुध्दा होते. भूमिपूजन सोहळा नरेंद्र भोंडेभों डेकर यांच्या मतदार संघात होत असल्याने व्यासपिठावरून जनतेशी संवाद साधण्याचा योग चालून आला.
भोंडेकर हे जरी अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले असले तरी ते अजूनही शिवसेना पदाधिकारी आहेत. शिवसेनेकड़ून जाहीर केलेल्या आमदारामध्ये भोंडेकरांचा समावेश आहे. त्यामुळे ते शिवसेनेचे आमदार म्हणून ओळखले जातात. काल शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप- सेना युती व्हावी यासाठी गडकरींनी गळ घातली.
शिवसेनेने आपल्या परंपरागत मित्राला दूर करता शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी तयार करत सत्ता स्थापन केली. आज या महाविकास आघाडी ला दोन वर्ष पुर्ण झाली असून दोन वर्षात आघाडीत अनेक वाद विवाद सुरु झाले आहेत. त्यात शिवसेना आमदारांची आपल्याला निधी कमी मिळत असल्याची ओरड सुरु झाली होती, त्यांच्याच हा परिणाम तर नाही ना की आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप सोबत पुन्हा दिलजमाई व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे,