लाखांदूर : लाखांदूर – वडसा मार्गावरील एका नाल्याजवळ भरधाव चारचाकी वाहन पुलावरून खाली कोसळले. यात जीवितहानी झाली नसली तरी, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना वडसा मार्गावरील सोनी गावाजवळील वानर मंदिर जवळ घडली.
सदर अपघातग्रस्त चारचाकी वाहन क्रमांक एम एच ३६ झेड ८८८७ ही लाखांदूर येथील कोयडवार यांची आहे. या मार्गाच्या रस्ता बांधकाम सुरू असून मागील काही दिवसांपासून काम अगदी संथगतीने सुरू असल्याने या मार्गावर छोटे मोठे अनेक अपघात झाले आहेत.