आंधळगाव : आंधळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्राम पिंपळगाव (कान्हाळगाव) येथे नाटकाचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदीप बुरांडे, सरपंच सदाशिव ढेंगे, चेतन ठाकूर, सरपंच इशन जिभकाटे, गभणे, चोपकर, भोंगाडे, उपरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नाट्यप्रयोगाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
