★ खुन करुन फेकल्याचा संशय
★ दिड तास ऊशिरा पोहचले पोलीस
विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क
बारव्हा : साकोली – लाखांदुर या राज्यमार्गावरील दांडेगाव फाट्यानजीकच्या जंगलात राज्यमार्गाच्या कडेलगत एका अनोळखी ५० ते ५५ वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळुन आला. सदर मृतदेह २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आढळुन आला असुन मृतकाला खुन करुन फेकण्यात आला असल्याच्या संशयास्पद चर्चेला ऊधान आले आहे तथापी या घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलीसांना देऊनही तब्बल दिड तासानंतर पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी एका ५० ते ५५ वर्षे वयोगटातील ईसमाचा मृतदेह राज्यामार्गाच्या कडेलगतचिया जंगलात फेकल्याचे आढळुन आले. सदर मृतदेहाच्या बाजुला मृतकाच्या खिशातील पैसे बाहेर पडलेले दिसुन येत असुन मृतदेबापासुन तब्बल ५ फुटावर त्याची पादञाने आढळुन आली आहेत.
या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच सबंधितांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी जाऊन मृतकाला पाहण्यासाठी गर्दि केली होती माञ घटना ऊघडकिस आल्यानंतर तब्बल दिड तासानंतर दिघोरी मोठी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
दरम्यान, मृतक हा कोणीतरी अनोळखी ईसम असल्याचे बोलले जात असतांना मृतकाचा खुन करुन रस्त्याच्या कडेलगतच्या जंगलात फेकण्यात आला असावा अशी संशयास्पद चर्चा नागरिकांत केली जात होती. दरम्यान राज्य मार्गाच्या कडेलगत मृतदेह फेकला असल्याची घटना दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ऊघडकिस येऊन सबंधित घटनेसबंधाने काही नागरिकांनी दिघोरी पोलीसांना भ्रमनध्वनीवरुन माहिती देऊनही चक्क दिड तोस ऊशिरा संध्याकाळचे ६ वाजता पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचल्याने ऊलटसुलट चर्चा केली जात होती.
या घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलीसांनी घेतली असुन पुढील तपास दिघोरी मोठी चे सहाय्यक ठाणेदार निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.