लाखनी पोलिसांचा अफलातून कारभार * जिल्हा पोलिस अधिक्षकाचे पत्रास केराची टोपली
लाखनी :
प्राण्यांना निर्दयतेने वागविने आणि प्राणी संरक्षण कायद्यान्वये जप्त करण्यात आलेली जनावरे पिंपळगाव/सडक खैरी येथील एका गो तस्कराचे गोशाळेत पाठवू नये. याबाबद जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा यांनी सर्व ठाणेदारांना पत्र क्रमांक ७०५/२०२१ दिनांक ११ जून २०२१ रोजी निर्देश दिले होते. या गो तस्कराचीच “अन्नपूर्णा” गो शाळा आहे. हे माहीत असूनही लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २२१/२०२१ अन्वये पकडण्यात २७ जनावरे त्याच तस्काराचे गो शाळेत पाठविल्याने लाखनी पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधीक्षकाच्या पत्रास केराची टोपली दाखविण्यात आल्याने पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात. याकडे गोवंश प्रमिंचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात २०११ ते २०१५ या कालावधीत स्वयंघोषित गो-रक्षकांकडून गो-वंश सेवेसाठी गोशाळा स्थापन करण्याचे पेव फुटले होते. त्यात पिंपळगाव/सडक ३ , रेंगेपार/कोहळी , खैरी , बाम्हणी , गडेगाव येथे एकूण ७ गोशाळा सुरू होत्या त्यापैकी सध्य स्थितीत ४ गोशाळा सुरू असून आदर्श गोशाळा पिंपळगाव/सडक , मा भवानी गोशाळा पिंपळगाव/सडक तसेच गडेगाव येथील गोशाळा सध्या बंद असल्या तरी या गोशाळांना २०१२ ते २०१४ या कालावधीत कत्तलखान्यात जाणारी जनावरे पोलिसांनी पकडुन पालनपोषणासाठी हजारो पाळीव जनावरे दिली होती. ती पाळीव जनावरे या गोशाळा संचालकांनी गो-तस्करांना परस्पर विकून स्वतः चा आर्थिक लाभ करवून घेतल्याचे गावकऱ्यांसह गो-वंश प्रेमींचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या “कमिटी टू मॉनिटर अँनिमल वेलफेअर लॉ इन् महाराष्ट्र” या संस्थेकडे लाखनी तालुक्यातील गो-शाळांबाबद अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्राणी कल्याण समिती मुंबई चे पशुकल्याण अधिकारी राजू गुप्ता यांचे एक सदसिय समितीने सखोल चौकशी करून २७ हजार गो-वंशाची गोशाळा संचालकांकडून विक्री करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला होता. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा यांना अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा यांनी प्राणी निर्दयतेने वागविने प्रतिबंधक कायद्यान्वये जप्त करण्यात आलेली जनावरे पिंपळगाव/सडक , खैरी गो शाळेत पाठवू नये. असे पत्र क्रमांक पोअभ/वाचक/जनावरे वाहतूक/गोशाळा/कारवाई/७०५/२०२१ भंडारा , दिनांक ११ जून २०२१ रोजी निर्गमित केले होते. आता आपल्याला पोलिस विभागाकडून जनावरे मिळणार नाहीत. याबाबद माहिती झाल्याने गो तस्कराणे पोलिस विभागातील हितचिंतकांच्या सल्ल्याने नुकतीच “अन्नपूर्णा” नावाची गो शाळा स्थापन केली. या बाबद लाखनी पोलिसांना माहीत असतांनाही अपराध क्रमांक २२१/२०२१ नुसार पकडण्यात आलेल्या ट्रक क्रमांक एमएच१२ एनएक्स ३४८५ ने २५ सप्टेंबर रोजी सिंधी लाईन चौक लाखनी महामार्गावर पकडण्यात आलेली २७ जनावरे(गोवंश) त्याच गो तस्करांच्या गो शाळेत पाठविण्यात आली. यात मोठे अर्थकारण झाल्याने लाखनी पोलिसांनी नियमबाह्य काम करून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाची अवहेलना केल्याच्या शहरात चर्चा होत आहेत. यात लिप्त पोलिसांवर काय कारवाई केली जाते. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.