भंडारा :
क्षुल्लक वादावरून रागाच्या भरात चिमुकल्यांसह विष प्राशन करणाऱ्या आईवर पो लिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यात चौदा महिन्याचा चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर मुलगी व आईवर नागपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता उपचार सुरू आहेत. वंदना ज्ञानेश्वर शहारे असे गुन्हा दाखल करणारे महिलेचे नाव आहे.

पेट्रो लपंप ठाणा येथील महात्मा फुले वार्डातील रहिवासी वंदना शहारे हीने मुलांना मस्ती का करता म्हणून रागावले असता तिच्या पतीने हटकले. यावर 14 डिसेंबर रोजी रात्री वंदनाचा पतीशी वादविवाद झाला. प्रसंगी वंदनाने रागाच्या भरात घरामध्ये असलेले तांदळात टाकण्या चे सल्फर नावाचे किटकनाशक मुलगा कार्तिक व मुलगी विधी यांना पाजून स्वतःही प्राशन केले. त्यामुळे तिघांचीही प्रकृती खाल्यावल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नागपूर येथे पाठविले. उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैद्यकीय अहवालावरून पोलिस हवालदार राजेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून वंदना शहारे हिच्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहे.