Saturday, July 27, 2024
Homeभंडारातिकीट वाटपात राजकीय पक्षांकडून युवकांचा विचार व्हावा

तिकीट वाटपात राजकीय पक्षांकडून युवकांचा विचार व्हावा

युवा वर्गाची मागणी
लाखनी :
सर्वच राष्ट्रीय व राज्यस्तरावरील राजकीय पक्षात आयाराम गयाराम संस्कृतीचा उदय झाल्याने पक्षनिष्ठ युवकांवर अन्याय होतो. निवडणुकीवर डोळा ठेऊन अनेक नेते व कार्यकर्ते आपले शक्ती प्रदर्शन करून पक्षांतर करतात. त्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येते. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रदेश व जिल्हास्तरीय धुरिणांनी तिकीट वाटपात युवा वर्गाच्या विचार करावा. अशी मागणी होत आहे.
कोविड – १९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रकोपामुळे जिल्हा परिषद , पंचायत समितीचा कार्यकाल संपूनही निवडणुका घेतल्या गेल्या नसल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांकडून व्यूह रचना आखली जात असली तरी सर्वच पक्षातील नेते मंडळींकडून गटातटाचे व कुरघोडीचे राजकारण केले जाते. पक्षातील वरचढ गटाकडून एकनिष्ठ पण कमकुवत गटातील पात्र व लायक उमेदवारास हेतूपूरस्पर डावलण्यात येते. त्यामुळे निवडणुकीचे तोंडावर तो पक्षांतर करतो किवा काहींना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही याची खात्री पटल्यावर पक्षांतराचा विचार समोर येतो. तेव्हा त्याची पक्षनिष्ठता , पक्ष वाढीसाठी केलेले प्रयत्न याचा पक्षश्रेष्ठीस विसर पडून जात आणि आर्थिक कुवतीला महत्त्व दिले जाते. या प्रकाराने त्या – त्या राजकीय पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. याकडे सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.


लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. पण युवकांचे काय ? असा युवा वर्गाचा प्रश्न असून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युवकांना तिकीट देण्यात अशी काळाची गरज असल्याचे युवकांनी सांगितले.
**प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)
विद्यार्थी जीवनात एनएसयूआय ह्या काँग्रेस विचारसरणीच्या संघटनेशी जुळून संघटनात्मक कामे केली. लाखनी तालुका निर्मिती नंतर मीरेगाव पंचायत समिती क्षेत्र व त्यानंतर मुरमाडी/तूप जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव झाले असताना मी स्थानिक असतांनाही मला डावलण्यात आले. कोणतेही पक्ष विरोधी काम केले नसतांना आताचे नेतृत्व पक्षाचे सभेलाही बोलावणे टाळतात.
कल्याण राऊत कार्यकर्ता काँग्रेस

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular