Saturday, July 27, 2024
Homeभंडारातिकीट वाटपात राजकीय पक्षांकडून युवकांचा विचार व्हावा

तिकीट वाटपात राजकीय पक्षांकडून युवकांचा विचार व्हावा

युवा वर्गाची मागणी
लाखनी :
सर्वच राष्ट्रीय व राज्यस्तरावरील राजकीय पक्षात आयाराम गयाराम संस्कृतीचा उदय झाल्याने पक्षनिष्ठ युवकांवर अन्याय होतो. निवडणुकीवर डोळा ठेऊन अनेक नेते व कार्यकर्ते आपले शक्ती प्रदर्शन करून पक्षांतर करतात. त्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येते. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रदेश व जिल्हास्तरीय धुरिणांनी तिकीट वाटपात युवा वर्गाच्या विचार करावा. अशी मागणी होत आहे.


कोविड – १९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रकोपामुळे जिल्हा परिषद , पंचायत समितीचा कार्यकाल संपूनही निवडणुका घेतल्या गेल्या नसल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांकडून व्यूह रचना आखली जात असली तरी सर्वच पक्षातील नेते मंडळींकडून गटातटाचे व कुरघोडीचे राजकारण केले जाते. पक्षातील वरचढ गटाकडून एकनिष्ठ पण कमकुवत गटातील पात्र व लायक उमेदवारास हेतूपूरस्पर डावलण्यात येते. त्यामुळे निवडणुकीचे तोंडावर तो पक्षांतर करतो किवा काहींना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही याची खात्री पटल्यावर पक्षांतराचा विचार समोर येतो. तेव्हा त्याची पक्षनिष्ठता , पक्ष वाढीसाठी केलेले प्रयत्न याचा पक्षश्रेष्ठीस विसर पडून जात आणि आर्थिक कुवतीला महत्त्व दिले जाते. या प्रकाराने त्या – त्या राजकीय पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. याकडे सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. पण युवकांचे काय ? असा युवा वर्गाचा प्रश्न असून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युवकांना तिकीट देणे आवश्यक झाले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular