Wednesday, April 24, 2024
Homeभंडारातंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

भंडारा :
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व पोलीस उपनिरीक्षक दिलीपकुमार घरडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात व लाखनी शहरातील शालेय तसेच बस स्थानक परिसरात सार्वजनिकरीत्या धूम्रपान करणाऱ्यांवर व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.


27 व 28 सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एकूण 22 नागरिकांवर कारवाई करून 1130 रुपये व 29 सप्टेंबरला लाखनी शहरातील शालेय तसेच बस स्थानक परिसरात 12 व्यक्तींवर सार्वजनिकरीत्या धूम्रपान करणाऱ्या व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली व 2100 रूपये दंड वसूल करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शैलेश कुकडे, आरती येळणे, कामिनी गेडाम, गुरुदेव बावनकुळे उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular