Tuesday, March 28, 2023
Homeभंडाराटायर दुकान व गोदाम जळून भस्मसात – पेट्रोल पंप/ठाणा येथील घटना

टायर दुकान व गोदाम जळून भस्मसात – पेट्रोल पंप/ठाणा येथील घटना

भंडारा :


सुमारास अचानक टायर दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान व गोदाम जळून भस्मसात झाल्याची घटना पेट्रो लपंप/ठाणे परिसरात घडली. या आगीमुळे दुकानमालक धनपाल ऊके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पेट्रो ल पंप ठाणा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या सव्हिस रोडच्या खाली धनपाल ऊके यांचे शंकरा ट्रेडर्स नावाने टायर दुकान आहे. आज 6 जून रोजी पहाटे 5.30 ते 6 वाजताच्या सुमारास या दुकानाच्या मागील भागात असलेल्या गोदामाला आग लागली.
वेळीच आग लागल्याचा अंदाज न आल्याने टायर तथा इतर ऑईलमुळे बंद दुकानात आगीने रौद्ररूप धा रण केले. यात गोदाम व दुकाना तील संपूर्ण साहीत्य जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा बाहेर आल्यानंतर परिसरातील नागरिकां नी आग विझविण्यासाठी धाव घेतली. परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात आनण्यासाठी जवाहरनगर येथील अग्नीशामक दलाचे पाचारण करण्यात आले. यानंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमुळे शंकरा ट्रेडर्सचे मालक धनपाल ऊके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानमालक उके यांचे सांत्वन केले. प्रसंगी त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular