पालांदूर : कोरोना काळात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याची दखल राज्यस्तरीय मदत या सामाजिक संस्थेने घेत शिक्षक ज्ञानेश्वर कळंबे यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव, काँग्रेसचे नेते तानाजी वनवे, दीनानाथ पडोळे, नगरसेविका हर्षला मनोज साबळे, आदीच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, दुपट्टा, पुष्पगुच्छ व संविधान भेट देत गौरविण्यात आले. कळंबे हे लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.