● केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांना उमेश मोहतुरे यांची निवेदनातून मागणी
भंडारा :-
भंडारा जिल्ह्यात एक सामान्य रुग्णालय तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपरुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र तर उपकेंद्र सुद्धा आहेत. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे २४ तास डॉक्टर उपलब्ध नसतात तर नर्सेसच्या भरोश्यावर ते असते, नर्सेस आपल्या वॉर्डातील रुग्णांची सेवा करतात. परंतु घटना कधी सांगून येत नाही तर अश्या वेळी अचानक कोणत्याही वेळेला रुग्ण दवाखान्यात आले असता त्यावेळी डॉक्टर हजर नसतात. अश्यावेळी कायमस्वरूपी २४ तास अनुभवी डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालय व इतरही ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे. याचे अगोदर घटना मोठी सर्व काही सांगून गेली. ज्याचा जातो त्याचा जातो. घटनेच्या वेळी संबंधित लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे जिल्ह्यात मोठया प्रमाणात दिसून आला. सामान्य जनता ही जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे प्रकृती बिघडली असल्यास येत असते, भरती असते त्यावर इलाज येथील डॉक्टर करीत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अनेक समस्या आहेत, तर दवाखान्यातील काही वॉर्डातील समस्या आजही जैसे थे मधे आहेत. औषधीचा तुटवडा असणे, डिमओची पोस्ट नाही, तर अनेकदा येथील यंत्र बंद असणे, वॉर्ड मधील बेड अभावी रुग्णांना खाली झोपावे लागते, सामान्य नागरिकांच्या रुग्णांना मग रेफर नागपूर ही चर्चा जास्त होत असते. दवाखाना कधी तर वाऱ्यावर दिसतो, कधी तर चौकशी विभाग मधील टेलिफोन बंद असतो. परंतु कायमस्वरूपी अनुभवी डॉक्टर २४ तास जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे असले पाहिजे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रुग्णा सोबत आलेल्या त्याचे नातेवाईक महिला असो या पुरुष त्याची गैरसोय होते. त्यासाठी त्या परिसरात राहण्याचे ठिकाण असणे आवश्यक आहे.

मेडिकल कॉलेज झाल्यास अनेकांना शिक्षण घेता येईल, तर त्या परिसरातील नागरिकांना त्या माध्यमातून रोजगार मिळेल, काही कामधंदा करता येईल यासाठी मेडिकल कॉलेज भंडारा येथे मोठे तयार करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा.डॉ. भारतीताई पवार यांना उमेश मोहतुरे जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा भंडारा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
*एसटी कामगारचे विलीनीकरण करा
भंडारा एसटी कामगार दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पासून बेमुदत संपावर बसलेले आहेत, एसटीच राज्य शासनात विलीनीकरण करून एसटी कामगारांना यथोचित न्याय देऊन ज्या 37 एसटी कामगारांनी आर्थिक परिस्थिती ला कंटाळून आत्महत्या केल्या, त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल. नियमाप्रमाणे सर्व सोई सुविधा,वेतन, घरभाडे,महागाई भक्ता राज्यशासनाने या एसटी कामगारांना द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.एसटीला शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी सर्व एसटी कामगार स्वयंस्फूर्तीने संपात सहभागी झाले आहेत.
● केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांना एसटी कामगारचे निवेदन
प्रशांत लेंडारे, राहुल जीवतोडे, सोहन मेश्राम, शामु शेंडे, साजनकुमार ईश्वरकर, सर्व एसटी कामगार भंडारा जिल्हा उपस्थित होते.सर्व मागण्यांकडे/ समस्यांकडे लक्ष केंद्रित करावे यासाठी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.सुनिल मेंढे, माजी खा.शिशुपाल पटले, उमेश मोहतुरे जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा भंडारा, राजेश निंबार्ते यांनी लेखी निवेदन दिले आहे.