Friday, April 12, 2024
Homeभंडाराजिल्हा इंटकची कार्यकारणीची सभा धनराज साठवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न

जिल्हा इंटकची कार्यकारणीची सभा धनराज साठवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न

भंडारा :
भंडारा जिल्हा राष्ट्रीय मजुर कांग्रेस इंटक ची सभा प्रगती महिला महाविद्यालय नागपुर रोड भंडारा येथे इंटकचे जिल्हा अध्यक्ष मा. धनराज साठवने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथि म्हणुन, भंडारा शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा प्रशांतभाऊ देशकर, नत्थुजी खंडाईत, जेष्ठ कांग्रेस नेता शेख नवाब, इंटकच्या जिल्हा महिला अध्यक्षा सुनंदा धनजोडे, इंटकचे जिल्हा संघटन सचिव श्रीकांत येरपुडे इत्यादि मान्यवर मंचावर उपस्थित होते.


सभेच्या सुरुवातिला राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मेनबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली. जिल्ह्यातिल संगठित व असंगठित मजुर कामगारांची यादि कामगार कार्यालयातुन मागवुन ज्या मजुर कामगारावर अन्याय होत असेल अशा कामगारांची मदत जिल्हा इंटक च्या माध्यमातुन होणार असुन आपण सर्व मिळुन त्यांना सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले. इंटकचे जिल्हा अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा धनराज साठवने यांनी इंटक मध्ये काम करणा-या प्रत्येक व्यक्तिंनी आपल्या सहका-यांना नेहमी जमेल ती मदत करावे व त्यांचा जिवनमानाचा दर्जा उंचवावा, त्याप्रमाचे संघटनेत काम करणा-यांचे आपण इंटकच्या माध्यमातुन हात बळकट करावे असे प्रामुख्याने सांगितले. कार्यक्रमाच्या अतिथींनी सुध्दा इटंकला व कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. या सभेमध्ये साकोली तालुका इंटक अध्यक्ष म्हणुन शैलेश सयाय, व साकोली शहर अध्यक्ष म्हणुन प्रसन्नजित राऊत यांना नियुक्ति पत्र देण्यात आले तर भंडारा शहर इंटकचे महासचिव म्हणुन गोपाल पराते यांना सुध्दा नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंटकच्या भंडारा शहर महिला अध्यक्षा स्नेहा भोवते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता, श्रीकांत येरपुडे, विजय चौधरी, हिरामनजी लांजेवार, नरेश जिभकाटे, सौ, माधुरी खंगार, नरेशचंद्र कावळे, केशव बाळबुधे, मदनलाल गराडे, वाय आर धुमनखेडे, विनोद डोंगरे, महेश पराते,नरेश जिभकाटे, इत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular