पोहरा : लाखनी तालुक्यातील खराशी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बोंद्रे यांची राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
खासदार प्रफुल पटेल, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, माजी खासदार मधुकर कुकडे, युवक जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, लाखनी तालुका अध्यक्ष डॉ विकास गभने, शहराध्यक्ष धनु व्यास, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नागेश पाटील यांच्या निर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेता हेमराज कापसे, सुधन्वा चेटुले, आसिफ पठाण, गुणवंत दिघोरे, शरद गायधनी, दिनेश निर्वाण, रामा गिरेपुंजे, रोहित साखरे तसेच लाखनी तालुका व शहरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.