• वैद्यकीय चमूने केली यशस्वी शस्त्रक्रिया
• परीचराची प्रकृती अत्यवस्थ , पण धोक्याबाहेर
लाखनी :-
येथील विदर्भ महाविद्यालयाच्या संचालक पुत्राने परीचरावर बंदुकीतून मारलेली गोळी फुप्पूसालगत असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला असून दिनांक २३ रोजी इंडोस्कोपी चे माध्यमातून २ तासाच्या अथक प्रयत्नानंतरही गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले नव्हते पुन्हा(दि.२५) रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ४ तासाचे अथक परिश्रमानंतर गोळी शरीराबाहेर काढण्यात यश मिळविले आहे.
नवशक्तीपीठ शिक्षण संस्था सावरी/मुरमाडी द्वारा संचालित विदर्भ कला वाणिज्य महाविद्यालयात लाखनी येथे कार्यरत भूगोल विभाग प्रमुख तथा संस्थेचे सहसचिव अमित हुकूमचंद गायधनी याने काम ऐकले नाही म्हणून परिचर सुभाष आगाशे यांचेवर छऱ्याच्या बंदुकीने गोळी झाडण्याची घटना(ता.२३) ला सकाळचे सुमारास उघडकीस आली होती. जखमी परीचारास तत्काळ भंडारा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले. प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला क्रिम्स हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून गोळी फुप्पुसालगत असल्याचा निष्कर्ष काढून गोळी काढण्याकरिता इंडोस्कोपी द्वारा २ तास प्रयत्न करूनही यश आले नव्हते. परत(दि.२५) ला पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने वैद्यकीय चमूने ४ तास सर्थीचे प्रयत्न करून फुप्पुसालगत असलेली गोळी काढण्यात यश मिळविले असले तरी त्या परीचारची प्रकृती अत्यवस्थ असली तरी धोक्याबाहेर असल्याचे समजते. लाखनी पोलिसांनी अमित गायधनी यांचेवर प्राणघातक हल्ला करणे. तथा हत्त्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अमित गायधने ची कारागृहात रवानगी(चौकट)
विदर्भ महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक अमित गायधनी याने परीचरावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुरावे गोळा करण्याकामी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी लाखनी यांचेकडे पोलिस कोठडी मिळण्याकामी पोलिसांनी विनंती केली होती. न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली होती. पोलिस कोठडी ची मुदत संपल्याने त्यास न्यायालयासमक्ष उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केल्याने अमित गायधने याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.