लाखांदूर : शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारुन परवानाधारक देशी दारु दुकानातून चढ्या दराने दारुची सर्रास विक्री केली जात आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे.
तालुक्यात जवळपास १० देशी दारुची किरकोळ विक्रीचे परवानाप्राप्त दुकाने आहेत. येथे १८० एमएल क्षमतेच्या देशी दारु बॉटलची शासन निर्धारित ५२ रुपये किंमत असताना या दुकानातून चक्क आठ रुपये अधिक वसुल करीत ६० रुपये दराने तर ९० एमएल क्षमतेच्या देशी दारु बॉटलची २६ रुपये किंमत असताना नऊ वसुल करीत ३५ रुपयामध्ये विक्री केली जात आहे. परवानाधारक दुकानांतर्गत चढ्या दराने देशी दारुची विक्री केली जात असल्याने अवैध दारु विक्रेत्यांच्या दारु विक्रीच्या दरातही कमालीची वाढ झाल्याची चर्चा आहे. सद्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने निवडणूक असलेल्या गावात सद्या मद्यपी मतदारांना सुगीचे दिवस आल्याचे बोलल्या जात आहे.मात्र देशी दारुच्या किमतीत परवानाधारक दुकानदारांनी कृतिम दरवाढ केल्याने मद्यपिमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवुन चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकाना विरोधात कारवाई करुन शासन निर्धारित किमतीत देशी दारुची विक्री होन्याहेतू आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील बहुतांश मद्यपिंनी केली आहे.