भंडारा :

आग लागून घर भस्मसात झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कों येथे घडली. सदर आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने घरमालकावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान आगीची माहिती होताच जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी घटनास्थळ गाठून घराची पहाणी केली. तसेच तात्पुरत्या स्वरूपात पिडीत कुटुबियांना आर्थिक मदत केली
कोंढा येथील रहिवासी कवडू मारोती राऊत यांच्या घराला रविवारी सकाळी अचानक आग लागली. सदर आगीत राऊत यांचे जीवनावश्यक साहित्यांसह इतर साहित्य जळून पूर्णतः खाक झाले. त्यामुळे राऊत कुटुबियांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. घटनेची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांना होताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पिडीत कुटुबियांचे सांत्वन केले. यावेळी आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये तसेच अन्यधान्य देऊन मदत केली . शासनाकडून लवकरच मदत देण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे जिभकाटे यांनी सांगितले.