भंडारा :
मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नरसिंह टोला गावातील रहिवासी गवतु बोंद्रेबों द्रेयांच्या घराला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या घटनेत सर्व साहित्यांसह मुलाच्या शिक्षणासाठी उधार घेतलेले पैसे अन् अनेक मौल्यवान आठवणी जळून खाक झाल्या. आता करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे. दररोजप्रमाणे बोंद्रेबों द्रेकुटुंबीयांनी आपली दैनंदिन कामं आटोपली. रात्रीचे जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मध्यरात्री अचानक काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे जाणवताच त्यांना जाग आली. झोपेतून जागे होताच समोरचे दृष्य पाहून घरच्यांना धक्काच बसला. समोरच्या खोलीतून धूर निघत होता, घरात आग लागली होती. सर्वांनी घाबरून आरडाओरडा केला.
आवाज ऐकताच शेजारी मदतीला धावून आले. गावकरी जमले आणि पाण्याच्या पंपाच्या सहाय्याने आग विझवण्याचे कार्य सुरू केले. सकाळपर्यंत कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवले. यानंतर गावकऱ्यांनी घराची पाहणी केली असता जवळपास सर्वच साहित्य आगीने गिळंकृत केल्याचे दिसले. बोंद्रेबों द्रेयांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, महत्वाची कागदपत्रे, दागिने, ५० हजार रुपये यांसह अन्य साहित्य जळून खाक झाले. बोंद्रेबों द्रेहे त्यांच्या परिवारातील अन्य पाच सदस्यांसह त्यांच्या मातीच्या घरात राहत होते. त्यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या मुलाला घशाचा आजार असून घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मुलाच्या उपचाराकरता नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले होते. मात्र, ते पैसेही आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने आता मुलाचा उपचार कसा करायचा, उसनवारीचे पैसे कसे फेडायचे, घर कसं उभं करायचं असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहेत.