भंडारा :
घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी जवळपास साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटना भंडा रा शहराती ल तकीया वार्डात उघडकीस आली. या प्रकरणी तन्वीर नसीम शेख यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तन्वी र शेख हे मंगळवारी आपल्या आईसह मध्यप्रदेशातील बालाघाट येथे कामानिमित्त गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी स्वयंपाक खोलीच्या दारातून घरात प्रवेश केल
यावेळी बेडरूममधील कपाटात ठेवलेले वीस ग्रॅम, सात ग्रॅम व 15 ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे हार, दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, सहा ग्रॅमचे सोन्याचे झुमके, पंधरा ग्रॅम सोन्याच्या तीन अंगठ्या, 20 ग्रॅम सोन्याचे एक जोडी कंगन असा जवळपास तीन लाखाचे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे पायपट्ट्या, कमरपट्टा, चांदीच्या अंगठ्या असे दोनशे साठ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिन्यासह दोन हजार नगदी चोरट्यांनी लंपास केले. दुस-या दिवशी तन्वीर शेख हे घरी परत आल्यावर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपींविपीं रुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जगणे करीत आहेत