Friday, April 12, 2024
Homeभंडारागणेश वार्डाचा राजा • साकोलीत प्राचिन श्री गणेश मंदीरात विराजले श्री बाप्पा

गणेश वार्डाचा राजा • साकोलीत प्राचिन श्री गणेश मंदीरात विराजले श्री बाप्पा

साकोली : साकोलीच नव्हे तर अख्ख्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात प्राचिन सन १९३२ पासून ब्रिटीशकाळीन राजवटातील श्री गणेश मंदीरात आज ( १० सप्टें.) ला ” गणेश वार्डाचा राजा ” श्री मुर्तीची थाटात स्थापना करण्यात आली.


श्री गणेश मंदीर गणेश चौक साकोलीत बाल गणेश उत्सव मंडळातील पदाधिकारी व सदस्यांनी यावेळीही कोरोनातील नियमांचे पालन करून मंदीरातच श्री गणेश मुर्तीची स्थापना केली आहे. तत्पूर्वी श्री गणेश मंदीरात गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर महापुजा आरती करण्यात आली. विशेष म्हणजे हे मंदीर सर्वात प्राचिन असून दूरवरचे भक्तगण श्रध्देने येथे दर चतुर्थीला येतात. दहा दिवस चालणा-या या गणेशोत्सवात कोरोनातील शासकीय नियमांचे पालन करून विशेष सहकार्य अशोक गुप्ता, राजू देशमुख, विजय जैन, तरूण जैन, गणेश देशमुख, मनोहर कापगते, उदाराम कापगते, रमेश डुंभरे, नामदेव शेंडे गुरूजी, आशिष चेडगे व समस्त बाल गणेश उत्सव मंडळातील सदस्य अथक परीश्रम घेत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular