भंडारा :
शहराजवळ असलेल्या गणेशपुर येथील हरिराम मेहर यांच्या गोठ्याला व घराला अचानक आग लागली. त्यात सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. मात्र २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.
घटनेची माहिती भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पवन मस्के यांना होताच घटनेची माहिती जनसेवक पवन मस्के यांनी अग्निशामक दल, पोलीस विभाग व विद्युत कर्मचाऱ्यांना दिली. तर गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असतांना अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या व अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र हरिराम मेहर यांचे मोठे झाले आहे. जनावरांसाठी ठेवलेली तणस आगीत जळून खाक झाली आहे. त्यात २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हरिराम मेहर यांच्या समोर पडला आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने मेहर यांना आर्थिक मदत देण्याची मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पवन मस्के यांनी केली आहे.