Thursday, September 19, 2024
Homeभंडाराखापा/तुमसर चौरस्त्यावर ट्रकची बसला जबर धडक !

खापा/तुमसर चौरस्त्यावर ट्रकची बसला जबर धडक !

*घटनास्थळावर समस्यांनी केले तोंड वर ; जीवित हानी टळली
तुमसर :
किरकोळ असो वा गंभीर, तुमसर तालुक्याच्या खापा येथील चौरस्ता अपघाताकरीता संपूर्ण क्षेत्रात नावाजला आहे. त्यातच शनिवारच्या सकाळी १० वाजे दरम्यान खापा येथे प्रवासी बस व ट्रकमध्ये भीषण टक्कर घडून आल्याची घटना घडली आहे. परस्पर विरुद्ध दिशेने धावणाऱ्या जड वाहनांमध्ये घडलेले हे अपघात मौक्यावरील प्रत्यक्षदर्शिंकरिता सिनेस्टाइल दृष्यच ठरले आहे. अपघात तर घडला मात्र जिविती हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ येथे टळल्याचे बोलले जात आहे. अपघातात ट्रकच्या जबर धडक दिल्याने बसच्या मागच्या बाजूचा अक्षरशः खेंदामेंदा झाला आहे. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा खापा चौरस्त्यावरील समस्यांनी तोंड वर करायला सुरुवात केली हे मात्र नक्की!


तुमसर आगारातून प्रवाशी घेऊन बस क्रमांक एम.एच. ४० एक्यु ६३२१ खापा मार्गे भंडारा निघाली होती. दरम्यान देव्हाडी मार्गे रामटेक धावणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ६७२७ ने खापा चौफुलीवर पोहोचलेल्या भरधाव बसला मागच्या बाजूला जबर धडक दिली. सदर घटना सकाळी १० वाजता घडली. अपघात घडताच बस अनियंत्रित होऊन अलगद सोमोर जाऊन थांबली. प्रत्यक्षदर्शींच्या मते बस चालकाच्या सावधगिरीने येथे मोठी जीवित हानी टळल्याचे बोलले जात होते. मात्र बसच्या डाव्या बाजूचे मागील भाग क्षतिग्रस्त झाले आहे. बस मधील प्रवाशी युवकांशी बोलून दैनिक विदर्भ कल्याणने अपघाताविषयी हकीकत जाणून घेतली. त्यात मिळालेल्या माहितीनुसार बसच्या वाहक तथा डाव्या बाजूने खिडकी लागत बसलेल्या सर्व प्रवाशांनी वारंवार हात दाखवून व ओरडुन ट्रक चालकाला थांबण्याचा ईशारा केला होता. मात्र भरधाव ट्रक चालकाने तसे केलेच नाही. त्यामुळे बस चालकाने वाहनाची गती वाढवून अलगद सर्व प्रवाशांचे जीव वाचविले. मात्र तरीही ट्रकने आमोरा सामोरून बसच्या मागील भागास धडक दिली.
खापा येथे जड वाहनाचे अवैध तळ आणि मुख्य चौरस्त्यावर थाटलेल्या दूनकातील हलक्या वाहनांच्या वर्दळीमुळे अपघात हे तेथील नित्याचे सत्य झाले आहे. बस – ट्रकच्या ह्या अपघातात जीवितहानी टळली असली तरी देखील अनेक प्रश्नांनी यातून तोंड वर केले हे मात्र नक्की. येथे खापा चौकात वाहतूक नियंत्रक कक्ष का नाही? जड वाहनांचे अवैध तळ येथे पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणाकडे बोट दाखविणारे ठरत आहे. त्यात आंतरराज्यीय जड वाहतुकीची वर्दळ खापा येथे प्रचंड प्रमाणात असते.मात्र खापा येथे साधे ट्रॅफिक सिग्नलदेखील नसल्याने असंख्य अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. शनिवारच्या दिवशी घडलेला हा अपघात वाहतूक नियामक सुविधे अभावी घडल्याचे बोलले जात आहे. त्यात तुमसर-भंडारा आणि रामटेक-गोंदिया ह्या मार्गावर खापालागत साधे गतिरोधकही येथे नाही. त्यात खापा हे तुमसर पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे ठिकाण असून देखील अपघात येथे घडताताच कशे? हा मुख्य संशोधनाचा विषय आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular