Saturday, July 27, 2024
Homeभंडाराकोरोना बाधितांनी दुखणे अंगावर काढू नका

कोरोना बाधितांनी दुखणे अंगावर काढू नका

भंडारा :
जिल्ह्यात को रोना बाधि तांची संख्या दिवसेंदिसें वस वाढत आहे. दोन दिवसांपासून दोनशेच्यावरून रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी ते सात दिवसात बरा होत असल्याची बाब दिलासादायक आहे. रुग्णांनी दुखणे अंगावर न काढता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्याने उपचार सुरू करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


कोरोनाच्या तिस-या लाटेत कोरोना बाधितां मध्ये घसा खवखवणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा अशा सौम्य किंवा मध्यम लक्षणे पहायला मिळत आहेत. पाच-सात दिवसांमध्ये लक्षणे कमी होऊन सात दिवसात रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, वास न येणे, चव न लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णाने अ‍ॅन्टीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर तपासणी करून घेणे, असेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्याने गृहविलगीकरण कालावधी कमी करण्यात आला आहे. नागरिकांनीही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने कोरोना चाचणी करावी. वेळेत निदान व योग्य उपचारामुळे कोरोना बाधितांना लवकर बरे लागते. तसेच स्वःमर्जीने प्राणवायू सिलेंडरचा वापर, स्किटी स्कॅन, स्वतः औषधोपचार करू नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिका-यातर्फे करण्यात आले आहे. 248 कोरोनाबाधितांची भर जिल्ह्यात बुधवारी 1979 व्यक्तींची क्तीं चाचणी केली असता 248 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात आता 891 सक्रिय रुग्ण आहे. बाधित आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 107, मो हाडी 3, तुमसर 37, पवनी 19, लाखनी 33, साकोली 35 व लाखांदूर तालुक्यातील 14 व्यक्तींचा क्तीं समावेश आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 61 हजार 408 इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59 हजार 383 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.70 टक्के आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular