Friday, April 12, 2024
Homeभंडाराकेंद्र सरकार घोषणाबाजी करतोय जनहितार्थ कार्य करीत नाही - खासदार श्री प्रफुल...

केंद्र सरकार घोषणाबाजी करतोय जनहितार्थ कार्य करीत नाही – खासदार श्री प्रफुल पटेल

**खा. पटेल यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये पक्ष प्रवेश
लाखनी :
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा च्या वतीने कच्छी मेमन सभागॄह, लाखनी येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी परिसरातील समस्यांवर कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी सुचविलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल म्हणाले की, केंद्र सरकार मोठी – मोठी घोषणा करीत आहे पण प्रत्यक्षात कोणतेही काम होतांना दिसत नाही. दिवसेंदिवस महांगाई वाढतच चालली आहे.

आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस सिलिंडर चे दर वाढतच आहे, जनता महागाईने त्रस्त झाली आहे पण याचे कोणतेही सोयरसुतक अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या ह्या सरकारला नाही.महांगाई ने जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. ज्यामुळे विकासाची गती मंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांनी जतनेला सहकार्य करण्याचे कार्य करावे कोवीड संक्रमण काळात कार्यकर्त्यांनी जनतेला सहकार्य केले आहे तसेच कार्य सुरू ठेवुन जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहचिण्याचे कार्य करावे. यावेळी सर्वश्री राजेंद्रजी जैन, मधूकरजी कुकडे, राजु भाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, दामाजी खंडाईत, रामलाल चौधरी, सरिता मदनकर, बोधनंद गुरुजी, हेमकृष्ण वाडीभस्मे, डॉ. विकास गभने, धनु व्यास, नागेश वाघाये, विनायक बुरडे, उर्मिला आगाशे, अशोक चोले, सुधनवा चेटूले, राजेश निंबेकर, अर्चना ढेंगे, सुरेंद्र निर्वाण, मनोज तहील्यानी, नरेंद्र चोले, राजेश निर्वाण, जितेंद्र बोंद्रे, प्रवीण बोरकर, रोहित साखरे, अरमान धर्मसहारे, माया अंबुले, संगीता उईके, सुनीता खेडीकर, नितीन निर्वाण, हेमराज कापसे, राजू पठाण, रामेश्वर गिर्हेपूजे, अशोक हजारे, सुनील बर्वे, मनोज पोहरकर , अरिफ बेग, मन्साराम मांढरे, दिनेश निर्वाण, रामकिशोर गिऱ्हेपुंजे, पंकज खेडीकर,चंदाताई लांडगे, प्रकाश निर्वाण, किशोर वारवाडे चंदाताई बडोले,प्रशांत मेश्राम,यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
या कार्यकर्ता बैठकी प्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लाखनी तालुक्यातील असंख्ये कार्यकर्तानी श्री सुनील फुंडे, राजेश निर्वाण, राजेश निबेकर, यांच्या मार्गदर्शनात पक्ष प्रवेश केला. यावेळी श्री प्रफुल पटेल यांनी सर्व प्रवेशितांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular