साकोली :
तालुक्यातील किन्ही(मोखे) येथील 19 शेतकर्याच्या 33 एकर जागेतील धानाच्या पुंजने एकाच वेळी आगीत जळुन खाक झाल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली आहे.एकाच वेळी गावातील 19 शेतकर्याचे धानाचे पुंजने आगीत भष्म्मसात झाल्याने गावात एकच खळखळ उडाली आहे.
किन्ही मोखे येथील धानाची कापणी करुन मळनी करण्यासाठी पुंजने करुन ठेवले होते.शनिवारी व रविवार रात्रीच्या दरम्यान काही समाजविघातक लोकांनी 19 शेतकर्यान्च्या धानाच्या पुंजन्याला आग लावल्याने ते आगीत संपुर्ण भस्मसात झाले.घटनेची माहिती आज रविवारला सकाळी गावात वार्यासारखी पसरली.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच.बी.भेन्डारकर सर यांचेसह पोलिस निरिक्षक भजने,मंडळ अधिकारी हलमारे,तुळशीराम पटले सर,
तलाठी तथा पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला.यात ज्या शेतकर्यांचे धानाचे पुंजने जळाले आहेत अशांची नावे पुढिलप्रमाणे जाधव हिरामण क्षीरसागर 3 एकर,शंकर श्रीराम क्षीरसागर 4 एकर,सुनिल रामजी क्षीरसागर 2.50 एकर,बाबुराव हिरामण क्षीरसागर 3 एकर,रामजी लिन्गा क्षीरसागर 3 एकर, भैयालाल रामजी कापगते 3 एकर,तिलकचंद यशवंत कापगते 1.50 एकर,मारोती जना नेवारे 2.50 एकर,होमराज रामचंद्र कापगते पाऊण एकर,विजय प्रल्हाद पटले 3 एकर,व्यंकट काशिराम कापगते 2 एकर, रमेश चैतराम पटले 2 एकर,मोतिराम इस्तारी फुलबांधे 2 एकर, प्रभाकर तुळशीराम फुलबांधे अर्धा एकर, रेखा क्षीरसागर 2 एकर, प्रदिप मासुलकर पाऊण एकर, एकनाथ सुनिल क्षीरसागर पाऊण एकर , नंदू मोतिराम फुलबांधे 1 एकर व माडकन दयाराम पटले 1.50 एकर असे एकुण 19 शेतकर्यान्च्या 33 एकरातिल धानाचे पुंजने जळुन खाक झाले आहेत.महसूल विभाग तसेच पोलिस विभागाने यात एकुण 8 लाख 25 हजार रुपयांची नुकसान झाल्याची माहिती सादर केली आहे.यावेळी पंच व पिडीत शेतकरी उपस्थित होते.