Monday, May 27, 2024
Homeभंडाराकर्जापायी शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

कर्जापायी शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

लाखांदूर :
शेतक-याने सततची नापिकी व कर्जाने त्रस्त होऊन स्वःमालकीच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना तालुक्यातील असोला शेतशिवारात 10 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुधाकर रामा नान्हे (62) असे मृतक शेतक-याचे नाव आहे. सुधाकर यांची आसोला येथे 1 एकर स्वःमालकीची शेतजमीन आहे. सुधाकरने विविध संस्था, बँक यासह काही नागरिकांकडून खासगी कर्जाची उचल केली करून खरिप पिकाची लागवड केली. मात्र लागवडीखालील पिकांवर अपर्याप्त पावसासह कीडरोगाचा प्रकोप झाल्याने पीक उत्पादनात घट आली.


त्यामुळे पीडित शेतकरी कर्ज परतफेडीला घेऊन त्रस्त झाला होता. दरम्यान घटनेच्या दिवशी सुधाकरने सकाळच्या सुमारास स्वःमालकीच्या शेतात दोरी घेऊन काही काम असल्याचे सांगून घरून निघून गेला. मात्र दुपारपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहणी केली असता सुधाकरचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. येथील पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक दुर्योधन वकेकार यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular