लाखनी :-
महाकवी वामनदादा कर्डक आणि शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी चे औचित्य साधून पेरियार ई. वे. रामसामी , कॉ. शरद पाटील , धम्मपाल अनागरिक यांच्या जयंती निमित्त तथा भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मुर्तीदिनाचे औचित्य साधून लाखनी च्या महाप्रज्ञ बुध्द विहारात १७ सप्टेंबर रोज शुक्रवार ला दुपारी १२ वाजता भगवान सुखदेवे , गजेंद्र गजभिये आणि डॉ. सुरेश खोब्रागडे ह्या लेखकांच्या एकूण ६ पुस्तकांचा तसेच महानाट्य ‘मूकनायक’ च्या फोल्डर चा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध कवी युवराज गंगाराम गोंदिया यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार असून साहीत्यिक सी.एम. बागडे अध्यक्षस्थानी राहतील. भगवान सुखदेव यांची ‘भारतीयांचा बुद्ध धम्म’ , ‘पेरियार इ. वे. रामसामी’ आणि ‘सम्मदिठ्ठी’ ही तीन पुस्तके तर गजेंद्र गजभिये यांचे ‘समता सैनिक दल: प्रशिक्षण , जडणघडण आणि कार्यप्रणाली’ हे एक पुस्तक तथा डॉ. सुरेश खोब्रागडे यांचे ‘आंबेडकरी कविता: आस्वाद आणि मीमांसा’ तसेच ‘क्रांतीनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशी दोन पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. डॉ. सुरेश खोब्रागडे लिखित , जतीन पाटील दिग्दर्शित असलेल्या तथा पंकज खांडेकर निर्मित महानाट्य ‘मूकनायक’ च्या फोल्डर प्रकाशनाचा समारंभ अतिथीच्या हस्ते होणार आहे.
भदंत नागदिपंकर स्थविर , डॉ. धनंजय भिमटे , डॉ. के.एल. देशपांडे , साकोली चे गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी हे सहाही पुस्तकांवर भाष्य करणार असून प्रमोदकुमार अनेराव , प्रल्हाद सोनेवाने , अ.सी. रंगारी , अनिता मधुदन नंदागवळी , अमृत बन्सोड , बापू इलमकार , रोशन जांभूळकर , माणिक गेडाम , पंकज खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून सूत्रसंचालन प्रा. राहुल तागडे तर आभार प्रदर्शन डॉ. रेवाराम खोब्रागडे करणार आहेत. या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुक्ताई बहुद्देशिय शिक्षण संस्था , सुधाई बहुद्देशीय संस्था , जनविकास बहुद्देशिय संस्था , अक्षरवन प्रकाशन , महाप्रज्ञा बुद्ध विहार आणि जागतिक आंबेडकर वादी साहित्य महामंडळ या संस्थांनी केले आहे.