Saturday, July 27, 2024
Homeभंडाराआरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका ;प्रकाश आंबेडकर

आरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका ;प्रकाश आंबेडकर

भंडारा :
”छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार, १८ अलुतेदारांच्या हातात तलवार देवून त्यांना त्याकाळात व्यवस्थेत सहभागी करून घेतले. मात्र, त्यानंतरच्या काळात ओबीसींचा केवळ वापर करण्यात आला.

आता संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संव भाजपच्या नादाला लागू नका,” असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी आरएसएस आणि भाजपवर आंबेडकर यांनी सडकून टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपव्यतिरिक्तही अनेक राजकीय पक्ष हिंदूंचे असून, त्या पक्षांत हिंदू आहेत. आरएसएस-भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाला मतदान करा, संविधानाशी प्रामाणिक असलेला पक्ष सत्तेवर असायला हवा,” ते ओबीसी महासंघातर्फे पार पडलेल्या मेळाव्यात बैठकीत बोलत होते.”आता संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर मतदानाच्या दिवशी शबाब, कबाब व पैसा) या पासून दूर राहून मतदान कराकारण मतदान झालं की, कुणी शबाब देणार नाही. असेही आंबेडकर म्हणाले. ‘देशाचा स्वतंत्र दिवस हा काळा दिवस म्हणून संघाने पाळला. तर पाकिस्तानचा स्वतंत्र दिन हा साजरा केला,” अशी टीका आंबेडकर यांनी केली. ओबीसी मेळाव्याला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाला होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular