Tuesday, June 18, 2024
Homeभंडाराआधारभूत धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्याचा ट्रक पकडलाजेवनाळा येथील प्रकार :पालांदूर पोलिसात तक्रार...

आधारभूत धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्याचा ट्रक पकडला
जेवनाळा येथील प्रकार :
पालांदूर पोलिसात तक्रार दाखल

लाखनी / पालांदूर : शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर स्वतःच्या धानाची पोती सुरक्षित आहेत की नाही हे बघताना काही शेतकरी तिथे हजर होते. त्यावेळी धानाचा भरलेला ट्रक उभा राहिला. सदर ट्रक मधील धानाच्या कट्ट्यावरील त्रिपाल सोडण्यात आले.

तेव्हा हा व्यापाऱ्याचा ट्रक असल्याचे प्राथमिक अंदाजात लक्षात आले. लगेच शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन पालांदूर कळविले. ट्रक क्रमांक एम एच ४०, बी एल ९८९९ असे आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील जेवणाळा येतील आधारभूत खरेदी केंद्रावर घडली.
आठ शेतकऱ्यांनी पालांदुर पोलिस स्टेशनला तक्रार देत न्यायाची अपेक्षा केलेली आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाचे सुमारे ३० ते ४० दिवसापासून धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. गोडाऊन फुल्ल झाल्याने धान खरेदी सुद्धा प्रभावित झालेली आहे. असे असताना व्यापाऱ्याचा धानाने भरलेला ट्रक थेट आधारभूत खरेदी केंद्रावर उभा राहिल्याने शेतकरी वर्ग आक्रोशित झाला. ट्रकचा चालक हेमराज रामपाल यादव (३२)भरतवाडा नागपुर असे चालकाचे नाव आहे. चौकशी केली असता सदर ट्रकचा भाडा राजहंस श्रावण टेंभुरणे (५५) रा. मांगली ता. लाखनी यांच्याकडून घेतले असून त्यांच्यासोबत आधारभूत धान खरेदी केंद्र जेवणाळा येथे आले असल्याचे सांगितले. प्रभारी ठाणेदार माधव वनवे व पोलीस शिपाई नाविद पठाण यांनी सदर ट्रक पालांदुर पोलीस स्टेशनला आणताना रस्त्याच्या अडचणीमुळे तो ग्रामपंचायत कार्यालय पालांदूर आवारात सरपंचाचा लेखी परवानगीने ठेवण्यात आलेला आहे.
सदर ट्रकचालकाचे बयानुसार उत्तरप्रदेशमधून धान खरेदी करून आणले असल्याचे सांगितले. यात सुमारे २८ टन धान असल्याचे समजले. पुढील कारवाई करिता तहसीलदार लाखनी यांना कळविले आहे. सदर प्रकरणाची नोंद पालांदूर पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणाची उचित कारवाई करीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा जेवणाळा येतील तक्रार करता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular