Friday, April 12, 2024
Homeभंडाराअवैध जनावरे वाहतूक करणारा ट्रक कारवाईवीणा सोडला !

अवैध जनावरे वाहतूक करणारा ट्रक कारवाईवीणा सोडला !

• लाखनी पोलिसांचा अफलातून कारभार

लाखनी :

कत्तलखाण्यात कत्तलीसाठी अवैध पाळीव जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ला लाखनी पोलिसांनी तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर पकडुन पोलिस ठाण्यासमोरील सर्व्हिस रोड वर ठेवून गुन्हा दाखल न करताच सोडून दिल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. यात मोठे अर्थकारण झाल्याच्या चर्चा शहरात होत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन मांडवली करणारे ते २ पोलिस कर्मचारी कोण ? याचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून दररोज गो तस्करी करणारे अनेक ट्रक पाळीव जनावरे भरून जातात. या बाबद पोलिस प्रशासनास माहिती आहे. यात मोठे अर्थकारण दडले असल्यामुळे कारवाईचे सौजन्य दाखविले जात नाही. एखाद्या गो तस्कराने ठराविक दिवशी हप्ता पाठविला नाही. तर देखाव्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा केला जातो. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान भंडारा कडून साकोली कडे जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ला लाखनी पोलिस ठाण्याचे पोलिस वाहन चालविणाऱ्या चालकासह एका पोलिस सहकाऱ्याने तहसील कार्यालयासमोरील महामार्गावर पकडले असता ट्रक मधील २ गो तस्कर पाळून जाण्यात यशस्वी झाले. ट्रक चालकास ट्रॅक सह पोलिस ठाण्याकडे नेण्यात आले. पोलिस ठाण्यासमोरील सर्व्हिस रोड वर काही वेळ ट्रक थांबवून त्यानंतर गणेश सर्व्हो सेंटर जवळ(डोंगरवार पेट्रोल पंप) ट्रक चालकासोबत आर्थिक देवाणघेवाण करून ट्रक सोडण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शिने सांगितले. त्यामुळे ट्रक चालकावर प्राणी संरक्षण कायदा तथा मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला गेला नसल्याचे विश्र्नसनिय वृत्त आहे. लाखनी पोलिस ठाण्यात दखल पात्र स्वरूपाचा गुन्हा असताना कारवाई केली जात नसल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे बोलले जाते.

लाखनी पोलिस ठाण्यात कार्यरत एका पोलिस वाहन चालकाचे गो तस्कर आणि गौण खनिज माफायांशी अर्थपूर्ण संबंध असल्याच्या शहरात चर्चा होत असून तस्करांना चोरीचा माल पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर नेण्यास हा पोलिस वाहन चालक मदत करीत असतो. त्याचे वर पोलिस ठाण्यातील कार्यरत अधिकाऱ्याचा वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे भ्रमणध्वनीची(मोबाईल) चौकशी झाल्यास सत्यता बाहेर पडण्यास फार वेळ लागणार नाही. या प्रकाराने पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. या गंभीर बाबीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करून पोलिस वाहन चालकासह असलेला तो पोलिस कर्मचारी कोण ? याचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular