भंडारा :
अवैध गो वाहतूक करणाऱ्या पिकपने कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही घटना आंधळगाव येथे
घडली. या घटनेत पिकप चालक जखमी झाला तर, सहा जनावरे थाेडक्यात बचावली. जखमी चालकाला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जंगल व्याप्त गावातून मोठ्या प्रमाणात अवैद्य जनावराची तस्करी, मॅगनीज, रेती, मुरूम व अन्य प्रकारच्या चोरींचेरीं चेप्रकार घडत असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या मार्गावर अशा प्रकारचे नेहमीच अपघात होत असतात.
रामटेककडून रात्री १ च्या सुमारास एक ट्रक कोळसा वाहून नेत होता. दरम्यान कांदरी वनविभाग ऑफिस समोरील रामटेक तुमसर अवैधरित्या गो वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकपने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. यात चालक फिरोज खान शेख जखमी झाला असून याला आंधळगाव पोलिसांनी मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. सदर पिकपमधून ६ जनावरे नेली जात होती, त्यांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश भट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पिकपमधील सहा जनावरे चिखला येतील गोशाळेत पाठविण्यात आली. या अपघाताप्रकरणी ट्रकचालक छत्रपती सिंग रघुवंशी (वय ३६, जि. जिल्हा सतना) याच्या तक्रारीवरुन पिकपचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.