भंडारा : पैशाची उधळपट्टी करून आपसात वैमनस्य करण्यापेक्षा ग्रामपंचायतीची अविरोध निवडणूक करा. अविरोध ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून २५ लाख रूपये देणार अशी घोषणा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.
धारगाव येथे कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार भोंडेकर बोलत होते. सात सदस्य संख्या असलेल्या गामपंचायतींना १५ लाख, नऊ सदस्य संखेला २० लाख तर नऊ पेक्षा अधिक सदस्य असलेल्या गावांना २५ लाख रुपये देणार असल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले. प्रत्येकाच्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची फार गरज असून कबड्डी हा अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे. कबड्डीतून सांघीक शक्तीचेही प्रदर्शन होते असे मत आमदार भोंडेकर यांनी व्यक्त केले.
एकच राजे, छत्रपती राजे क्रिडा मंडळ धारगावच्या वतीने या स्पर्धेचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्त्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. चिराग चेटूले, उमेश सार्वे, निलकंठ कायते, महेंद्र निंबार्ते व इकबाल सिद्दीकी, पवन कोराम, शिवाजी रेहपाडे, प्रवीण नावरे, मानसी कोटांगले, धीरज पंचबुध्दे, अशिन नंदेश्वर, रविकिरण कोटांगले, अरूण नावरे, मारोती गिर्हेपुंजे, नंदू रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.