Thursday, May 16, 2024
Homeभंडाराअनेकांनी बांधली राष्ट्रवादीची घड्याळ

अनेकांनी बांधली राष्ट्रवादीची घड्याळपक्षप्रवेश : बेला येथील कार्यकर्ता मेळाव्यात परिवर्तन
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कुशल नेतृत्वावर आणि त्यांनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बेला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. यावेळी हा पक्षप्रवेश झाला.


भात उत्पादक जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व म्हणून खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे सर्वसामान्य नागरिक बघत आहेत. शेतकरी, सर्वसामान्य मजूर यांच्यासाठी ते शासनाच्या माध्यमातून निधी खेचून आणण्यात सक्षम ठरले आहेत. भंडाराच नव्हे तर, गोंदिया जिल्ह्यातही ही प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर अनेकांचा विश्वास आहे. याच विश्वासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्षप्रवेश करून पक्षाला सक्षम बनविण्यास विश्वास कार्यकर्त्यांनी दाखविला आहे.
बेला येथील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गेडाम व त्यांच्यासोबत सुमारे ६० युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, गणेशपुरचे ग्रामपंचायत सदस्य मयूर भुरे यांच्यासह त्यांच्या ४० युवकांनी प्रवेश केला. सागर चेटूले व त्यांच्या २५ युवकांनी प्रवेश केला. दवडीपार येथील १० युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जया सोनकुसरे, सोनू खोब्रागडे आदी उपस्थित होते. खासदार पटेल, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाध्यक्ष पंचबुद्धे, माजी खासदार कुकडे यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दुपट्टे घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये बेला येथील प्रमोद गेडाम, अमोल मेश्राम, अफरोज पठाण, सोनू पिकलमुंडे, शुभम निंबार्ते, भगवान बांते, योगेश बांते, आदेश नारनवरे, अमोल वंजारी, उमेश शेंडे, राजू जयस्वाल, महेश केवट, महेश शेंडे, सोनू काटेखाये, मनोज खोब्रागडे, कुलदीप कावळे, शेखर भोतमांगे, सारंग राघोर्ते, राधेश्याम उताणे, विनोंद शेंडे, शामराव डाकरे, मुकेश सुखदेवे, चंद्रभान रामटेके, रानी तिरपुड़े, कावळे बाबुजी, निखिल आंबेडारे, तुषार रंगारी, विशाल जोगडे, सुरेश कनोजे, उत्कर्ष शेंडे, पंकज वासनिक, पंकज चौधरी, दिलीप थोटे, पीयूष बंसोड़, अनिकेत कानतोड़े, संकेत चवटे, मयूर अतकरी, सचिन मोटघरे, जयंत बाड़ेबुचे, प्रशांत गजबिये, शुभम बांगड़कर, अमन वासनिक, आशीष कावळे, पप्पू उके यांचा समावेश आहे. तर, दवडीपार येथील राजू मते, गोपाल पगाडे, प्रशांत राखडे, बाबुराव खंगार, कवडू राखडे, हिरालाल कांबळे, राजकपूर वाट यांचा समावेश आहे. गणेशपूर येथील मयूर भुरे, ऋषिकेश भुरे, चेतन गभने, अन्सार चव्हाण, रिजवाण चव्हाण, समीर खान, दीपक कोल्हे, पवन मेश्राम, योगेश उईके, अंकुश नंदेशवर, दानिश शेख, अन्सार पठाण, अनिकेत भाजीपाले, मीनल बागडे, निखिल आगलावे, नदीम खान, उत्कर्ष मेश्राम, निपुण कुरणजेकर, वशिम शेख, सागर गोरे, सौरभ मुटकुरे, नदीम खान साद झमा, सिराज अन्सारी, आर्यन खान, प्रदूमन साकुरे, आमीन खान, सोनू साठविणे, सौरभ हेडवू, हिमांशू डोंगरे, गौरव येरकडे, बालू हडपे, गोलू फुलकर, साहिल मोरे, पीयूष पांडे, सौरभ उके, उदवत गजभिये, सायन खान, तुषार वलथरे, सागर चेटूले, भगवान बाभरे, कीशोर नागपुरे, विजय वैद्य, मार्कण्ड दुपारे, गणेश मोहकर, कल्पेश मेश्राम, बादल बोन्द्रे, संतोष खरके, सैलेश सेलोकर, साईनाथ घारगडे, सागर चेटूले, सूर्या राखडे, सुमित शेंडे, शुभम बडवाईक, गुरुदेव टांगले, पिंटू निंबार्ते, रोहित साकुरे, सौरभ माकडे, अनिकेत बोरकर, भावेश भाकरे व इतर अशा शेकडो युवकांनी प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक यशवंत सोनकुसरे यांनी केले. तर आभार चैतराम सेलोकर यांनी मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular